जागतिक महिला दिनी जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका,
गटप्रवर्तक व फ्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराचे वितरण
भंडारा, दि. 9 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिन 8 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभाग जिल्हा परिषद, भंडारा यांचे विद्यमाने मंगलम सभागृह भंडारा येथे आशा गटप्रवर्तक, फ्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्काराचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी हे कोविड काळातील खरे कोविड यौध्दे होत असे गौरवउद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा विनय मून यांनी व्यक्त करुन सर्व आशा, गट प्रवर्तक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा, नागपूर डॉ.रविशेखर धकाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किरण कोवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुवर, जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी डॉ.माधुरी माथुरकर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन चव्हाण हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद सोमकुवर यांनी आशास्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांनी फ्लोरेंन्स नाईटिंगेल यांचे विचार व आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजात आरोग्य सेवेचे कार्य करुन आशा गटप्रवर्तक व फ्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रमुख पाहुणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) किरण कोवे यांनी आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सहाय्यक संचालक (वैद्यकीय) आरोग्य सेवा नागपूर डॉ.रविशेखर धकाते यांनी कार्यक्षेत्रात आरोग्य सेवा देतांना काय काय अडचणी येतात याबाबत मार्मिक उदाहरण दिले. जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर यांनी आशास्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे जिल्हा कोविड लसीकरण व नियमित लसीकरणात राज्यात एक नंबर असल्याचे मत व्यक्त करुन सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
जिल्हास्तरीय फ्लोरेंन्स नाईटिंगेल पुरस्कार : आरोग्य सेविका संवर्ग – प्रथम- विद्या व्ही.मदनकर, व्दितीय- सुरमन यु.धुर्वे, तृतीय- दिपाली व्ही.पडोळे, आरोग्य सहाय्यिकासंवर्ग- प्रथम- प्राची ए. कांबळे, व्दितीय- भारती एन.भेंडारकर, तृतीय- अंतकला एस.सुखदेवे, स्टॅाफ नर्स – प्रथम- संगीता के. मानकुरे, व्दितीय- लता एस. लांजेवार, तृतीय- गिता आर. गजभे
जिल्हास्तरीय आशा पुरस्कार : आशा स्वयंसेविका- प्रथम – सविता अनिल शरनागत (दावेझरी, गोबरवाही, तुमसर), व्दितीय – रेखा रमेश कुभंलकर (रोहा, बेटाळा,मोहाडी)
जिल्हास्तरीय गट प्रवर्तक पुरस्कार : गट प्रवर्तक – प्रथम – मनिषा नगरकर (खांबा, साकोली), व्दितीय- ममता मेश्राम (गोंडउमरी, साकोली), तृतीय-चंदा लेदारे (खांबा, साकोली)
पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन साथरोग शास्त्रज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर तर आभार प्रदर्शन जिल्हा समुह संघटक आशा योजना चंद्रकुमार बारई यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता चंद्रमणी मेश्राम, सरिता निर्वाण, दमयंती कातुरे, अश्विनी बागडे, अस्मिता खोब्रागडे, नलु पडोळे, सुनिता मेहर, संजु राघोर्ते व सर्व तालुका समूह संघटक, गट प्रवर्तक व राष्ट्रीय आरोग्य अभियान/आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.