मनसेच्या संघर्षातून स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम,मनसेचे मनदिप रोडे यांचे पुढाकार
एकाना कोळसा स्वामीत स्थानिकांना कामावर घेण्यास प्रारंभ, राजकारण करणाऱ्यांची बोलती बंद
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
वरोरा तालुक्यातील एकोना कोळसा खाणीत कार्यरत खासगी कंपनीत स्थानिक एकोणा, मार्ग, परनखटी गावातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मनसेने वेलेल्या संपला मोठे प्राप्त झाले आहे. स्थानिक बेरोजगारांना कंपनीने कामावर घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीसाठी ताटकळत असलेल्या बेरोजगारांनी रोजगार मिळाल्याने मनसेचे मनदिप रोठे यांचे आभार मानले असून स्थानिक युवकांमध्ये मनसेच्या कार्याबाबत आकर्षण वाढले आहे. एकोना कोळसा खानीत खाजगी कंपनीकडून स्थानिकांना कामावर घेण्यास नकार दिला जात होता. याचवेळी मात्र कंपनी परप्रांतीयांना कामावर ठेवत होते. स्थानिक प्रकल्पग्रस्त, गावातील युवकांनी आमची शेती, जमिन घेऊन आणखी कंपनीचे प्रदुषण, जड वाहतुकीने अपघाताची मालीका सारख्या समस्या आम्ही का सहन करावी असा संतप्त सवाल करीत मनसेचे मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात कंपनी व स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिशीला वारंवार भेटून, निवेदन देऊन पाठपुरावा केला. अखेर मनसेच्या संघर्षाचा विजय झाला. कंपनीने स्थानिकांना कामावर घेण्यास प्रारंभ केला आहे. मोठया प्रयत्नाने नोकरी मिळवून दिल्याने स्थानिक युवकांनी मनसेचे मनदिप रोडे यांचे आभार मानून धन्यवाद दिले.
यावेळी मनसे नेते मनदिप रोडे यांनी एकोना कोळसा खाणीत कार्यरत खासगी कंपनीत स्थानिकांना कामावर घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबाबत त्यांचे आभार मानले व स्थानिक युवकांना मनसे रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे मग ते खुलेपणाने असो की मागच्या दाराने आपल्या जीवावर उदार होऊन प्रयत्न करणार असे वचन मनदिप रोडे यांनी स्थानिकांना दिले. परिसरात मनसेच्या संघर्षामुळे मनसे च्या कामात युवक आकर्षीत झाले आहे. या संघर्षात मनविसे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत झुन्जारे,मनविसे तालुका अध्यक्ष गौरव मेले, आकाश काकडे, संदिप आरडे,राकेश हनुमंते, राहुल मडावी,रोशन बतकी स्वाभी राऊत आदि मनसैनिक उपस्थित होते.