अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती बाबत आवाहन
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166
भंडारा, दि. 6 : राज्यातील सर्व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती/फ्रिशिप चा लाभ देणेकरिता महाराष्ट्र शासनाने Mahadbtmahait.gov.in हे ऑनलाईन पोर्टल सुरु केलेले आहे.
शैक्षणिक सत्र 2021-2022 करिता ज्या आदिवासी विद्यार्थ्यांनी इयत्ता 11 वी व त्या पुढील शिक्षणाकरिता शासन/विद्यापीठ मान्यता प्राप्त शाळा/महाविद्यालय/संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांनी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करणे सुरु झालेले आहे. तरी विद्यार्थ्यांनी प्रवेशित महाविद्यालयास ऑनलाईन अर्ज सदर वेळेत भरावे.
ऑनलाईन अर्ज सादर करतांना शिष्यवृत्ती करीता आवश्यक सर्व कागदपत्रे जसे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मागील वर्षाची गुणपत्रीका, डोमेशिअल प्रमाणपत्र, (शिष्यवृत्ती करिता उत्पन्न मर्यादा 2 लाख 50 हजार) इत्यादी कागदपत्रे दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत अपलोड करावी, जेणेकरून शिष्यवृत्ती/ फ्रिशिप चा लाभ घेणे शक्य होईल, तसेच शाळा/कॉलेज व्यवस्थापनाने संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत सुचना देण्यात याव्या, तसेच शाळा/कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्याचे परिपूर्ण ऑनलाईन भरलेले अर्ज तातडीने या कार्यालयास ऑनलाईन सादर करावे.
सदर पोर्टल 31 जानेवारी 2022 पर्यंत सुरु राहणार असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे.