संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन
भंडारा, दि. 26 : भारतीय लोकशाहीचा आत्मा म्हणजे भारताचे संविधान आहे. आज संविधान दिनानिमित्त संविधानाचा जागर जिल्ह्यात विविध शासकीय कार्यालयांमध्ये करण्यात आला. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संविधान दिनाच्या निमित्ताने सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर आज जिल्हा ग्रंथालय कार्यालयामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. तसेच संविधान दिनाच्या निमित्ताने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथपाल डॉ. धनंजय गभने तसेच लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे व सहायक नियोजन अधिकारी वैशाली मळेकर व ग्रंथालय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.