माजी मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
चंद्रपूर, ता. २४ : कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकारनगर येथे दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व चंद्रपूरचे सुपुत्र दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई उराडे, नगरसेविका शीतल गुरनुले, नगरसेविका वनिताताई डुकरे, नगरसेवक सोपान वायकर, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, श्रीमती मालोदे, श्री. नवले यांची उपस्थिती होती.