पुरोगामी साहित्य संसद आणि पत्रकार संघाच्या वतीने काव्य स्पर्धा
पुरोगामी साहित्य संसद,जिल्हा चंद्रपूर आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाच्या औचित्याने चंद्रपूर जिल्हास्थरिय आंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “देशाची शान,भारतीय संविधान” असा या काव्य स्पर्धेचा विषय असून,जवळपास जिल्ह्यातील ३० महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनीनी स्पर्धे करिता आपले नामांकन केले आहे.
आज दिनांक २४
नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ११ वाजता श्रमिक पत्रकार भवन,(वरोरा नाका)चंद्रपूर येथे आयोजित या काव्य स्पर्धेचे अध्यक्ष प्रसिद्ध अधिवक्ते एड.राजेश सिंग राहतील.प्रमुख उपस्थिती म्हणून पुरोगामी साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे,पुरोगामी साहित्य संसदेच्या जिल्हाध्यक्ष एड.योगिता रायपुरे,कार्याध्यक्ष विजय भासारकर सर उपस्थित राहतील.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवियत्री सीमा भासारकर, तर आभार प्रदर्शन मृणाल कांबळे करतील.
अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना ३ हजार,२ हजार,१ हजार रोख पारितोषिक,सन्मानचिन्ह,व प्रशिस्ती पत्रक देण्यात येईल.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कवी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पुरोगामी साहित्य संसदे च्या जिल्हा उपाध्यक्ष संगीता घोडेस्वार,जिल्हा सहसचिव शुभांगी ठाकरे यांनी केले आहे.