भंडारा, दि. 1 : 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अंतर्गत 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्याकरीता 61-भंडारा (अ.जा.) विधानसभा मतदार संघातील भंडारा तालुक्यातील सर्व मतदान केंद्राचे ठिकाणी, तहसिल कार्यालयाचे ठिकाणी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी सर्व जनतेच्या अवलोकनासाठी व उपयोगासाठी प्रसिध्द करण्यात आली आहे.
सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करुन घ्यावी. मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी मतदार नोंदणीकरीता मतदान केंद्राचे ठिकाणी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) (शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शाळा, ग्राप. शिपाई) यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज भरुन द्यावा, असे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अरविंद हिंगे यांनी कळविले आहे.