पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
Ø विविध विभागांचा घेणार आढावा
चंद्रपूर दि. 28 ऑक्टोंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून कमलाई निवास, रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.
शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी, सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत संबंधित विभागाशी आढावा बैठक. सकाळी 11.45 वाजता कर्नाटक पॉवर कार्पोरेशन लि. व बरांज कोल माईन्स प्रा. लि. येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आढावा बैठक. तसेच एम्टा व्यवस्थापन व कामगारांमध्ये दि. 30 सप्टेंबर 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या आश्वासनांची पूर्तता होण्याबाबत बैठक. दुपारी 12.30 वाजता जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत प्राप्तनिधी, खर्चित निधी, अखर्चित निधी, प्रस्तावित कामे तसेच कार्पेट क्लस्टर बाबत आढावा बैठक. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावावर झालेली कार्यवाही, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.
दुपारी 2.30 वाजता बांधकाम विभागांतर्गत जिल्ह्यात सुरू, अपूर्ण, प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.15 वाजता सिंचाई विभागासह मध्यम, लघू, पाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु, पूर्ण प्रस्तावित कामांबाबत तसेच कामनिहाय प्राप्त निधी, खर्चित निधी, अखर्चित निधी याबाबत आढावा बैठक. दुपारी 3.45 वाजता मूल तालुक्यातील, ग्रामपंचायत बेंबाळ येथील पाणीपुरवठा समस्येबाबत आढावा बैठक. सायंकाळी 4.15 वाजता घुगुस शहरातील वार्ड क्र. 6 मधील सन 2014-15 मध्ये बांधकाम केलेले सभागृह जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण करण्याबाबत बैठक. सायंकाळी 4.45 वाजता आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, कोविड-19 व जिल्ह्यातील आरोग्य विषयासंदर्भात संबंधित आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयाबाबत आढावा बैठक. सायंकाळी 5.15 वाजता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे वाटप करून पट्टे देण्याबाबत बैठक. सायंकाळी 5.45 वाजता पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक. सायंकाळी 6.15 वाजता परिवहन (आरटीओ) विभागातील अधिकाऱ्यांसोबत वाहतूक संदर्भात चर्चा. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथे आगमन व मुक्काम.
रविवार दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9:30 वाजता हिराई विश्रामगृह, ऊर्जानगर येथून सिंदेवाहीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे विभागीय कृषी संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित धान महोत्सव, शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या आयोजित कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1 वाजता शिवटेकडी रत्नापुर ता. सिंदेवाही येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता सिंदेवाही येथून कमलाई निवास,रामदास पेठ, नागपूरकडे प्रयाण.