भंडारा,दि.18:- बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे मार्फत बकरी पालन (गोट रिअरींग) विषयीचे 10 दिवसीय मोफत प्रशिक्षण वर्ग 22 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होत आहे. या प्रशिक्षणात बकऱ्यांच्या जाती, प्रजाती, आहार, औषधोपचार, लसीकरण, पालन पोषण, कर्ज विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसाय संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना तसेच वित्तीय योजनांची माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीला येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशन कार्ड, आधार कार्ड व मनरेगा कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, चहा, नाश्ता, वह्या – पुस्तके, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल.
स्वयंरोजगाराची आवड व व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किवा नापास अशा बेरोजगार पुरुष व महिलांनी मुलाखतीकरीता 22 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता बी.ओ.आय. स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था लाल बहादूर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था संचालक एस. डी. बोदेले यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता मोबाईल नंबर 7559231974, 9511875908, 7972386263 आणि 9766522984 वर संपर्क करावा.