21 ऑक्टोबर रोजी तृतीयपंथी व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी कॅम्प
Ø वैद्यकीय तपासणीच्या आधारे मिळणार तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र
चंद्रपूर दि.18 ऑक्टोबर : जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना केंद्र शासनाच्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक तसेच आरोग्य विभाग, चंद्रपूर यांच्याकडून दि. 21 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्ह्यातील तृतीयपंथी
व्यक्तीचे वैद्यकीय तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. सदर कॅम्प सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्यायभवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथी व्यक्तींनी सदर कॅम्पमध्ये येऊन वैद्यकीय तपासणी करावी व तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. प्राप्त प्रमाणपत्राच्या आधारे उपरोक्त पोर्टलमध्ये संबंधित माहिती भरणे सोयीचे होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.