8 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन
चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयात मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, क्रीडा व युवक सेवा संचालनालय व आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने 8 ते 14 वर्षाआतील खेळाडू मुलांची जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन दि. 8 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर, (विसापूर) येथे करण्यात आले आहे.
तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याच्या दृष्टीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता आधारकार्ड, टी.सी. आदी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. क्रीडा नैपुण्य चाचणीच्या प्रवेशासाठी 1 जानेवारी 2022 रोजी मुलाचे वय 8 ते 14 वर्ष असणे आवश्यक राहील. खेळ प्रकारांमध्ये डायव्हींग खेळासाठी मुलाचे 8 ते 12 वर्ष वयोगट तर अॅथलेटिक्स, आर्चरी,बॉक्सिंग, कुस्ती, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग करिता मुलाचे वय 10 ते 14 वर्ष वयोगट तर ट्रायथलॉन खेळासाठी 13 ते 14 वर्ष वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर क्रीडा नैपुण्य चाचणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.