पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर दि. 30 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पालेबारसा, ता. सावली जि. चंद्रपूर येथे आगमन व महात्मा गांधी जयंतीनिमित्त पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘समस्या मुक्त गाव अभियान’ कार्यक्रमांस उपस्थित. सायंकाळी 4 वाजता पालेबारसा येथून सावलीकडे प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता वनविभाग कार्यालय, सावली येथे आगमन व वनविभागातर्फे आयोजित वन्यजीव सप्ताह कार्यक्रमास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.
रविवार दि. 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व तालुक्यातील विकास कामांबाबत आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.
मंगळवार दि. 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता पोलिस ग्राउंड, चंद्रपूर येथे राज्य शासनाकडून प्राप्त अद्यावत रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. सकाळी 11.30 वाजता धान खरेदी संदर्भात करावयाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. दुपारी 12.15 वाजता रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी सिंचाई, कृषी, वीज यासह बी-बियाणे कंपन्यासोबत आढावा बैठक. दुपारी 1 वाजता घरकुल व डाटा एंट्री ऑपरेटर संदर्भात आढावा बैठक. दुपारी 1.45 वाजता वणी- वरोरा- माढेळी बायपास रस्त्याकरीता भूसंपादनाबाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील
वीस कलमी सभागृहात, अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.