शेतकरी कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला सिंदेवाहीत पाठिंबा
अखिल भारतीय कांग्रेस पक्ष आणि सहकारी संघटना च्या वतिने “शेतकरी-शेतमजूर” बंधु-भगिनी वर होत असलेल्या अन्याय-अत्याचार आणि त्याचे विरुद्ध संसदेत बहुमताचा ग़ैरफ़ायदा घेत करण्यात आलेले “कृषि विषयक काळे कायदे” इत्यादीच्या निषेधार्थ दिल्ली येथील केंद्र सरकारच्या निर्णयात्मक धोरनाना घेवून केन्द्रातिल “भाजपा प्रणीत नरेंद्र मोदी सरकार विरुद्ध बंद पुकारण्यात येवून प्रामुख्याने तालुका कांग्रेस कमेटी कार्यालयाच्या प्रांगनात मौखिक सभा घेवून निषेध नोंदविन्यात आले
“शेतकरी-शेतमजूर” बंधु-भगिनिवर होत असलेला अन्याय, मागील अठरा महिन्यापासुन होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध संसद-भवनासमोर ठान मांडून बसलेला “शेतकरी-शेतमजूर” “किसान काळा कायदा” हा कश्याप्रकारे घातक आहे, यामुळे सामान्य शेतकरी-शेतमजूर यांच्या कुटुंबियांवर कश्याप्रकारे आघात होईल, परिणामी कृषिव्यापारास खिळ बसेल, आणि याचे महा-भयंकर असे दूरगामी परिणाम निव्वळ शेतकरी-शेतमजूर बाधवालाच नाही तर समाजातील संपूर्ण घटकाला भोगावे लागतील आणि शेतकरी आत्महत्याचे प्रमाण पुनश्चः वाढेल परत सरकार आणि शेतकरी यांच्या मध्ये मोठी दुफली निर्माण होईल आणि हा देशातील समाज-घटकावर मोठा आघात ठरेल असे मनोगत आपल्या प्रास्ताविकेद्वारे रमाकांत लोधे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी सिंदेवाहि तथा जी.प. सदस्य चंद्रपुर यानी व्यक्त केले तसेच या काळ्या कायद्याच्या विरोधात आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या त्यातही महत्वाचे म्हणजे चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आजघडीच्या समस्यानवर प्रकाश टाकताना चंद्रपुर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि शेतकरी-शेतमजूर महासंघाचे अध्यक्ष रघुनाथजी शेंडे यानी सुद्धा सदर निषेध सभेमध्ये आपले विचार मांडताना भाजपप्रणीत केन्द्रातिल सरकारच्या कॄषिविष्यक ध्येय-धोरणावर चांगलेच तोड़सुख घेताना ऐरवी देशातील अर्थचक्राच प्रमुख आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांच्या ज्या गति-न-गति मोदी साहेब करित आहेत या करीता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्याना कधीच माफ करणार नाही, मागील दीड वर्षापासून गरीब शेतकरी आपल्या न्याय-हक्काच्या मागण्या घेवून संसदभवनासमोर देशातील काना-कोपऱ्यातिल शेतकरी आपल्या मागण्याना घेवून धरने-आंदोलन करित आहेत आणि मोदी साहेब अजूनही बोलघेवड़ेपनातून बाहेर यायला तयार नाहीत, चारशे शेतकऱ्यांच्या बली घेणाऱ्या या व्यक्तिस त्या चारशे लोकांचा आत्मा आणि त्यांचे कुटुंबिय कधीच माफ करणार नाहीत आणि या जगाचा खरा मालक शेतकरी-शेतमजूर यांच्या आन्दोलनाची धार ही आता शेवटच्या टोकावर गेल्या शिवाय राहणार नाही आता “आमच्या भारतातील शेतकरी-शेतमजूर करो-या-मरो” या भूमिकेत आलेला आहे आता हे आंदोलन कोणत्या टोकाला जाणार हे सांगणे काठिनच अश्या शब्दात त्यानी शेतकऱ्यांच्या वेदना-दुखद भावना आपल्या मार्गदर्शपर विचारातून मांडलेल्या आहेत.
या निषेध सभेचे सूत्र-संचालन आणि शेतकऱ्यांबद्दल समारोपिय वेदना, आणि प्रामुख्याने विदर्भातील शेतकरी या आंदोलनात कश्यातप्रकारे सक्रिय होईल आणि “आपल्या शेतकरी-शेतमजूर भावाच्या आंदोलनात विदर्भाच झंझावात दाखवून ” या आंदोलनाची धार कशी तीव्र करुण दाखवेल या करीता उत्स्फूर्त आणि प्रेरक शब्दातुन युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ते यानी समारोपिय आभारत्मक भावना व्यक्त करित सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि लगेच निषेध सभा संपल्यानंतर “शेतकरी-शेतमजूर” याना न्याय द्यावे, काळा कायदा रद्द करावा, महागाईचे दर कमी करावे, रोजगाराच्या संधि उपलब्ध करुण दयाव्यात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो हमिभाव द्यावा, आश्वासनाची खैरात न देता ठोस निर्णय घ्यावे आणि त्या निर्णयाची त्वरित अमलबजावनी करावी, आत्महत्या ग्रस्त कुटुम्बियाना सरकारी नोकरित पात्रतेनुसार स्थान द्यावा ईत्यादी न्यायोचि मागण्यांचे निवेदन विद्द्यमान तालुका कार्यकारी दंडाधिकारी जगदाले साहेबाचे मार्फ़तिने केंद्र सरकार तसेच सम्बंधित मंत्रालयाना देण्यात आले देण्यात आलेल्या निवेदनाचा पाठपुरावा संबंधित मंत्रालय आणि विभागाकडे करेंन अशी गवाही तहसिलदार यांनी दिली.
प्रसंगी सदर निषेध सभेला सीमाताई सहारे अध्यक्ष तालुका महिला कांग्रेस सिंदेवाहि, आशाताई गंडाटे अध्यक्ष न.प. सिंदेवाहि, स्वप्निल कावले उपाध्यक्ष न.प. सिंदेवाहि, नेहा समर्थ सरपंचा ग्रा.प. लोनवाहि, नरेन्द्रजी भैसारे गटनेता तथा नगरसेवक न.प. सिंदेवाहि, भुपेश लाखे नगरसेवक न.प. सिंदेवाहि, पुष्पाताई मडावी नगरसेविका न. प. सिंदेवाहि, प्रणाली जीवने नगरसेविका न.प. सिंदेवाहि, भास्करजी नन्नावार सदस्य ग्रा.प. लोनवाहि, राजुभाई (इब्राहिम) शेख माजी उपसरपंच ग्रा.प. लोनवाहि, सचिन नाडमवार माजी सरपंच ग्रा.प. गडमौशी, अशोक तुम्मे तालुका सचिव सेवादल कांग्रेस, रविजी सावकूडे, मयूर सूचक अध्यक्ष तालुका युवक कांग्रेस सिंदेवाहि,प्रविन मोगरे, रौशन वारजुरकर सिंदेवाहि, गुणवंत अलमस्त, सचिन सहारे सदस्य ग्रा.प. पळसगाव, लताताई गेडाम, निमात्रिता कोकोडे, ऋषिलोखंडे, अशोक सहारे,मोरेश्वर ज्ञानवाडकर, इत्यादि असंख्य कांग्रेस पक्ष आणि शेतकारी-शेतमजूर महासंघाचे सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.