शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पहायला मिळत आहे. कुत्र्यांमधील रेबीज संक्रमण टाळण्यासाठी त्यांना ‘रेबीज प्रतिबंधक लस’ दरवर्षी देणे गरजेचे असते. ऍनिमल बर्थ कंट्रोल रुल २०२१च्या (डॉग्स) नुसार अँटी रेबीज प्रोग्रॅमअंतर्गत चंद्रपूर शहरातील सर्व भटक्या व मोकाट गावठी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका व प्यार फाउंडेशनच्या वतीने कुत्र्यांना अँटी रेबीज लस दिली जाणार आहे. ही लस देण्यासाठी फिरते पथक तैनात करण्यात येणार आहे. आपल्या गावठी कुत्र्यांना लस देण्यासाठी स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंदरे (7028882889) व कुणाल महल्ले (९४४६८२१८३१) यांच्याशी संपर्क साधावा. या मोहिमेत प्यार फाउंडेशनचे देवेंद्र रापेल्ली, कुणाल महले, अर्पित सिंग ठाकूर, विनोद डोंगरे, ओम जयस्वाल सेवा देणार आहेत.