अंशुल बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा
Ø अंशुलला दत्तकमुक्त घोषित करणार
चंद्रपूर दि. 23 सप्टेंबर: महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील अंशुल नावाच्या बालकांला दत्तकमुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित
पालकांनी सात दिवसांच्या आत बालकाबाबत आपला हक्क दाखविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.
नागभीड येथील पवन नागरे यांच्या शेतात रोडलगत दि. 3 जून 2021 रोजी एक दिवसाचा नवजात बालक आढळून आला होता. सदर बालकाला नागभीड पोलिसांनी काळे चाईल्ड हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल केले. बालकाची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्या बालकाला बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर आणण्यात आले. बालकल्याण समितीने सदर बालकाचे नाव आपल्या दप्तरी अंशुल असे नोंदवून, महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
या ठिकाणी साधा संपर्क:
अंशुल नामक बालकाच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, चंद्रपूर, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह/बालगृह, डॉ.राजेंद्र आल्लुरवार बिल्डींग,सी-18, शास्त्रीनगर, किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष द्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर किंवा किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच सदर बालकाबाबत आपला हक्क दाखवावा अन्यथा बालकल्याण समिती, चंद्रपूर हे अंशुल बालकांला दत्तक मुक्त घोषित करेल आणि किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करेल.