पुनर्वसित मौजा सिनाळा या गावाला महसुली गावाचा दर्जा
लेखी आक्षेप असल्यास 1 ऑक्टोबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर : शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग दि.1 जुलै 1976 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये महसूली गावाचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
त्या अधिकाराचा वापर करून चंद्रपूर तालुक्यातील नवीन सिनाळा या महसूल गावाचे मौजा दुर्गापूर येथील सर्व्हे क्रमांक 12,13,14,15,16,17, 73 व 74 चा भाग रस्ता मध्ये पुनर्वसन केलेल्या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप अधिसूचना काढलेल्या आहेत. चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा, मसाळा, जुना, नवेगाव या गावाचे सोबतच्या निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या चंद्रपूर तालुक्यातील नवीन सिनाळा नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रुपांतर करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने कोणत्याही व्यक्तीस काही आक्षेप असल्यास त्यासंबंधीचे लेखी आक्षेपाचे अर्ज दि. 1 ऑक्टोबर 2021 पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करावे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.