जिल्ह्यात 7 लाख नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस
2 डोस घेणाऱ्यांची संख्या 2 लाख 12 हजार
लस घेणाऱ्यांची एकूण संख्या 9 लाख 25 हजार
भंडारा,दि.16 : कोविड 19 आजाराचा सामना करण्यासाठी ‘लस’ हाच एकमेव उपाय असून शासनाने नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवित आहे. भंडारा जिल्ह्यात लसीकरणाने वेग धरला असून लसीचा पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 7 लाखाच्या वर गेली आहे. जिल्ह्यात 7 लाख 12 हजार 904 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
सर्व नागरिकांना प्राधान्याने लस देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आली असून विशेष शिबिराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते. ‘एकच मिशन, लसीकरण’ या ध्येयाने संपूर्ण यंत्रणा काम करत असून जिल्ह्यात आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 9 लाख 25 हजार 97 एवढी झाली आहे. यापैकी 7 लाख 12 हजार 904 व्यक्तींनी पहिला तर 2 लाख 12 हजार 193 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.
अ.क्र. | तालुका | पहिला डोस | दुसरा डोस | एकूण |
1 | भंडारा | 157393 | 61839 | 219231 |
2 | लाखांदूर | 72272 | 17249 | 89521 |
3 | लाखनी | 94860 | 28860 | 123720 |
4 | मोहाडी | 91765 | 22175 | 113940 |
5 | पवनी | 91390 | 23492 | 114883 |
6 | साकोली | 97315 | 28085 | 125400 |
7 | तुमसर | 107910 | 30492 | 138403 |
एकूण | 712904 | 212193 | 925097 |
‘लस’ हाच कोरोनावर एकमेव उपाय आहे. सध्या युनायटेड किंगडम मध्ये तिसरी लाट सुरू आहे. या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे बाधितांची संख्या तीस टक्क्यांनी खाली आली आहे. तर कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण 95 टक्क्यांनी कमी झाले आहे. यावरून लसीकरणाचे महत्व लक्षात येते. आपल्याकडेही तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ‘लस’ घेणारे व्यक्ती धोक्याबाहेर असणार आहेत. या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.