जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक
- रुग्ण डिस्चार्ज01
- एकूण डिस्चार्ज58951
- एकूण पॉझिटिव्ह60085
- क्रियाशील रुग्ण01
- आज00 मृत्यू
- एकूण मृत्यू1133
- रिकव्हरी रेट98.11 टक्के
- मृत्यू दर01.89
- आजच्या टेस्ट35
- एकूण टेस्ट452807
भंडारा,दि.11- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या सुध्दा एक आहे. आज 35 व्यक्तींची चाचणी केली असता 01 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्यात आता 01 सक्रिय रुग्ण आहे.
आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58951 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60085 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 52 हजार 807 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60085 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 01, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58951 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60085 झाली असून 01 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
- कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
- जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
- सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे,सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.