सर्व जि.प. आदर्श शाळांनी एकदा सावित्रीबाई फुले शाळा बघावीच- नामदेव आस्वले मुख्याध्यापक

आदर्श शाळा चिंचाळातील शिक्षकांची सावित्रीबाई फुले शाळेला भेट
सर्व जि.प. आदर्श शाळांनी एकदा सावित्रीबाई फुले शाळा बघावीच- नामदेव आस्वले मुख्याध्यापक
चिंचाळा:-
आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी शैक्षणिक अभ्यासदौरा उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा, बाबुपेठ (म.न.पा. चंद्रपूर). येथे आदर्श शाळा चिंचाळा मधील शिक्षकवृंदानी भेट दिली. भेटीदरम्यान शालेय परिसर अतिशय रमणीय , इमारत प्रशस्त व शैक्षणिक सुविधांसह सुसज्ज, प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर व डीजीटल सुविधा. बालापेंटींगसह भिंती अतिशय बोलक्या. वर्ग नर्सरी ते दहावी पर्यंत आणि विद्यार्थी संख्या एक हजाराहून अधिक. शिक्षक संख्या सोळा, पटसंख्येनुसार पुन्हा ६ ते ७ शिक्षकांची आवश्यकता. अध्यापनात डीजीटल साहित्यांचा नियमीत वापर. सन २०१४ मध्ये याच शाळेत फक्त ७० विद्यार्थी होते त्यामुळे काही शिक्षक अतिरिक्त ठरले. पण २०१४ पासूनच जेव्हा मा.नागेश नीत ( मु.अ.) यांचेकडे जेव्हा प्रभार आला तेव्हा पासून शैक्षणिक क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा वापर करून अवघ्या ६‌ वर्षात शाळेचा कायापालट केला व आज पटसंख्या हजारच्या वर झाली आहे.
‌शालेय शिस्त व शिक्षकांचे मनापासून तन-मन-धनाने सहकार्य यामुळे हे शक्य झाले असे सरांनी‌ सांगीतले. आज कोरोना महामारी असतांना सुद्धा शिक्षण सतत आँनलाईन व आफलाईन सुरू आहे. जसा सुंदर बगीचा व भौतीक सुविधा आहेत त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी गुणवत्ता शाळेत आहे. शिक्षणातच नाहीतर सर्व मुल्ये व संस्कार आत्मसात केलेले विद्यार्थी अशी जडणघडण या शाळेत होत आहे. त्यामुळे निश्चितच परिसरातील खाजगी शाळेतील विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत आहेत. म्हणूनच मा. नागेश नीत (मु.अ.) तथा शिक्षकवृंद यांचे हे कार्य अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे.
२१ व्या शतकातील गुणवत्तापुर्ण शिक्षण कसं द्यायचं व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी कसे घडवायचे हे या शाळेकडून शिकण्यासारखे आहे. करीता जि.प. चंद्रपूर च्या सर्व आदर्श शाळांनी तसेच इतर सर्व शाळांनी एकदा या सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा बाबुपेठ,चंद्रपूर ला निश्चितच भेट द्यावी. आज म.न.पा. च्या शहीद भगतसिंग शाळा, भारतरत्न भिमराव आंबेडकर शाळा, तसेच सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी शाळा या तीन शाळांना भेट देण्यात आली.
म.न.पा. उपायुक्त मा. गराटे साहेब यांची भेट घेऊन शाळेची प्रगती समजून घेतली. आणि शाळा भेट उपक्रमांतर्गत या अभ्यास दौर्याची सांगता करण्यात आली. निश्चितच हा दौरा शालेय विकासासाठी प्रेरणादायी ठरणार यात शंकाच नाही.

शब्दांकन
श्री. प्रविण ईश्वर डोर्लीकर
भा.अ.वा.आं. शाळा चिंचाळा