कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार

कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा – आ. सुधीर मुनगंटीवार


आ. मुनगंटीवार यांनी ग्रामस्‍थांसह केला पाहणी दौरा
 
बल्‍लारपूर तालुक्‍यातील कोठारी या गावातुन जाणा-या राष्‍ट्रीय महामार्गाशी संबंधित नागरिकांच्‍या मागण्‍यांच्‍या अनुषंगाने त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. कोठारी गावातुन जाणारा राष्‍ट्रीय महामार्गाचा हा भाग गावाचे सौंदर्य वाढविणारा ठरावा अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.
 
दिनांक २६ ऑगस्‍ट २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राष्‍ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. जयस्‍वाल, कार्यकारी अभियंता श्री. मिश्रा, उपकार्यकारी अभियंता श्री. बोबडे यांच्‍यासोबत या विषयासंदर्भात पाहणी दौरा केला. यावेळी नागरिकांच्‍या मागण्‍यांच्‍या अनुषंगाने दोन्‍ही कडून रस्‍त्‍याची रूंदी कमी झाली आहे ती वाढवत झाडे लावण्‍यासाठी जागा ठेवावी असे निर्देश दिले. रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला शेवटपर्यंत सिमेंट नाली असावी अशी मागणी गावक-यांनी केली. याबाबत त्‍वरीत अंदाजपत्रक तयार करण्‍याचे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. रस्‍ता दुभाजकाच्‍या मधल्‍या भागात पथदिवे लावावे अशी मागणी गावक-यांनी केली. याबाबत त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. नाल्‍यापासून तलावापर्यंत रस्‍ता दुभाजक, पथदिवे व नाली बांधकाम करण्‍याची मागणी गावक-यांनी केली. याबाबत सुध्‍दा त्‍वरीत अंदाजपत्रक तयार करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. स्‍पीड ब्रेकर डांबरापासून तयार करण्‍याबाबत आ. मुनगंटीवार यांनी विभागाला निर्देश दिले. विभागानी सुध्‍दा त्‍वरीत कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन दिले. या पाहणी दौ-यादरम्‍यान जिल्‍हा परिषद सदस्‍या वैशाली बुध्‍दलवार, बल्‍लारपूर पं.स. सभापती इंदिरा पिपरे, उपसभापती सोमेश्‍वर पदमगिरीवार, सरपंच मोरेश्‍वर लोहे, उपसरपंच सावित्रा मोहुर्ले, ग्रा.पं. सदस्‍य स्‍नेहल टिंबडिया, संजय सिडाम, तालुका सरचिटणीस रमेश पिपरे, विलास राजुरकर, अमोल कातकर, सर्व ग्राम पंचायत सदस्‍य व गावातील प्रतिष्‍ठीत नागरिकांची उपस्थिती होती.