आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बंराज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना मिळणार तात्काळ न्याय
विधानभवन मुंबई येथे बैठक संपन्न
भद्रावती तालुक्यातील बरांज खुली कोळसा खाणीचे आवंटन मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सन 2014 मध्ये रदद करण्यात आलेले होते. त्यानंतर कोळसा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने 31 मार्च 2015 रोजी बंराज खुली कोळसा खाण परत कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड यांना आवंटीत करण्यात आली. पंरतू कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड अणि एम्टा कोल लिमीटेड यांचा वाद उच्च व सर्वोच्च न्यायालायात असल्याने दि. 1 एप्रील 2015 पासुन सदर कोळसा खाण बंद होती. ती आता नोव्हेंबर 2020 पासुन प्रत्यक्ष स्वरुपात सुरु झालेली आहे. परंतु कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड या कंपनी कडुन अजुन पर्यंत तेथील प्रकल्पबाधीत बरांज गावातील गावकऱ्यांच्या व खाणीतील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्या उदा. बरांज मोकासा व चेक बरांज गावांचे पुनर्वसन, कामगारांचे थकीत वेतन व सुधारीत नियुक्ती पत्र, उर्वरीत प्रकल्पग्रस्तांना नौकरी, उर्वरीत शेती संपादित करणे. प्रकल्पात स्वंयरोजगारांच्या संधीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य् देणे. इत्यादी गंभीर समस्या सोडविलेल्या नाहीत. यासाठी शासनाकडे तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातुन कंपनी प्रशासनाला वारंवार कळविण्यांत आलेले होते. तरी सुध्दा स्थानिक जिल्हा प्रशासन व कंपनी प्रशासन यांनी प्रकल्पबाधीत बरांज गावातील गावकऱ्यांच्या व खाणीतील प्रकल्पग्रस्त कामगारांच्या समस्यांना बगल देऊन खदानीचे खोदकाम सुरु केलेले आहेत. यामुळे गावात व प्रकल्पबाधित कामगारांत तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या वतीने आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात खदान परिसरात आंदोलन करून खदानीचे कार्य बंद पाडले होते. त्यावेळेस कंपनी प्रशासनाने व जिल्हा प्रशासनाने लेखी स्वरूपात प्रकल्पग्रस्तांच्या समस्याचे लवकरात लवकर निराकरण करू असे कळविले होते.
पंरतू समस्याचे निराकरण न झाल्याने काही दिवसापुर्वीच आ. सुधीर मुनगंटीवार यांना बंराज प्रकल्पग्रस्तांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते. सदर निवेदनाची दखल घेवुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 24 ऑगष्ट 2021 रोजी विधान भवन मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले.
बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या महत्वांच्या विषयावर चर्चा करून निर्णय करण्यात आले.
प्रामुख्याने पुर्वीच्या कार्यरत प्रकल्पग्रस्त कामगांराना 15 दिवसांत सुधारीत नियुक्ती पत्र देण्यात येईल, महाराष्ट्र सरकारकडून निश्चित केलेले कोल वेजेस व कामगांराना इतर मोफत मिळणाऱ्या सुविधा तात्काळ देण्यात येईल ,बंराज खुली कोळसा खान या प्रकल्पात 80 टक्क्याहुन अधिक प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांना नौकरीत समाविष्ट् करण्यात येईल, बंराज मोकासा व चेकबंराज या दोन्ही गावाचे पुर्नवसन बाबत कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र लीहुन दोन्ही गावातील घरांच्या संख्येची (मालमत्तेची) माहीती मागीतलेली आहे. सदर माहीती प्राप्त होताच पुर्नवसन प्रक्रीयेला सुरवात करून मालमत्ता धारकांना आर्थिक मोबदला देण्यात येईल,
महाराष्ट्र शासन निर्णयाप्रमाणे उर्वरीत प्रकल्पग्रस्तांची शेतजमीन संपादित करण्यात येईल., प्रकल्पात स्वंयरोजगारांच्या संधीमध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल हे निर्णय बैठकीत घेण्यात आले.
बंराज खुली कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या महत्वांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करून निर्णय घेण्यात आले. सदर बैठक आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री. देवरावजी भोंगळे अध्यक्ष भाजपा चंद्रपूर, श्री. सौगत उपाध्याय, कार्यकारी निर्देशक एम्टा कोल लि. श्री. प्रभू स्वामी मुख्य अभियंता, कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमीटेड, श्री. आर.बी. सिंग तांत्रिक निर्देशक , एम्टा कोल लि. श्री. प्रविण ठेंगणे प्रकल्पग्रस्त तथा सभापती पं.स.भद्रावती, श्री. अजय दुबे, सरचिटणीस भाजपा कामगार आघाडी महाराष्ट्र, श्री. संजय ढाकणे, श्री. सुधीर बोढाले, श्री. श्रीराम महाकुलकर, प्रकल्पग्रस्त् व कामगार प्रतिनिधी, श्री. गुलशन शर्मा, श्री. कैलास गुप्ता यांचे उपस्थितीत विधान भवन मुबई येथे बैठक संपन्न झाली.