शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलींची) प्रवेश प्रक्रिया सुरू
चंद्रपूर दि. 26 ऑगस्ट : चंद्रपूर येथील स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलींची), ऑगस्ट 2021-22 मधील सत्राकरीता तसेच विविध व्यवसायात प्रशिक्षण घेण्याकरीता प्रवेश देणे सुरू आहे. सदर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने राबविण्यात येत आहे.
इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी दि. 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. तसेच प्रवेशोच्छुक उमेदवारांनी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर त्याबाबतचे प्रवेश निश्चितीकरणाचे शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्चित करावा व त्यानंतर उमेदवारांनी आयटीआय असलेल्या व्यवसायनिहाय विकल्प सादर करावे. जेणेकरून प्रवेश घेतेवेळेस व्यवसायाची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ऑनलाईन प्रवेश अर्जाकरीता निश्चितीकरण शुल्क हे मागासवर्गीय उमेदवारांकरीता रुपये 100, सर्वसामान्य प्रवर्गाकरीता रुपये 150, तर महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांकरीता रुपये 300 इतके शुल्क भरणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेश निश्चितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
मुलींच्या, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बेकर अँड कन्फेक्शनरी, बेसिक कॉस्मेटालॉजी, कोपा, ड्रेस मेकिंग, वीजतंत्री, फ्रूट वेजिटेबल अॅंड प्रोसेसिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस (इंग्लिश), सुईंग टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसाय उपलब्ध असून विविध व्यवसायाकरीता 200 जागा उपलब्ध आहे. प्रवेशाकरीता किमान 10 वी पास तर काही व्यवसायाकरिता 10 वी नापास उमेदवारांनासुद्धा प्रवेश दिला जाईल.
प्रवेशासंबंधी तसेच अधिक माहितीकरीता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा संस्थेचे गटनिर्देशक क्र. 9422568464, शिल्पनिर्देशक क्र. 8830724629 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.