आत्मविश्वास आणि मेहनत नेहमीच यश मिळवून देते
शिवानी करणार भंडारा ते युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग !
परीश्रमाला जिद्द आणि चिकाटीची जोड असली तर माणसाला काहीही अशक्य नसते. नभात देखील उंच भरारी घ्यायला माणूस घाबरत नाही खूप शिकाव मोठ व्हाव अशी इच्छा मनोमन बाळगून असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा घेवून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गाप्रमाणे शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा त्रिसुत्रीपणे खूप शिकावे शिकल्यानेच मनुष्य मोठा होतो अशी विचारधारा असलेली शिवानी हिने स्वत:ला घडविले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला घरची परिस्थिती अतिशय हलाखीची गरीब परंतु इच्छा तेथे मार्ग ही कहाणी आहे भंडारा जिल्ह्यात एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या शिवानी गंगाधर वालदेकर या हुशार तरुणीची वडील गंगाधर जानूजी वालदेकर हे मजूर म्हणून हाताला पडेल ते काम करतात. आई कांचन गंगाधर वालदेकर गृहीणी आहेत. आई शिकलेली डी.एड झालेली परंतु आईच्या वडीलांनी त्यांना नोकरी करु दिलेली नाही. घरात वडील एकटेच कमावते त्यांच्या मजुरीच्या भरवशावर घरचा उदरविर्नाह चालतो. घरात तीन बहिण गरीब कुटूंब परंतु आई उच्च शिक्षित व स्त्रीवादी विचाराची असल्यामुळे आपल्या मुलींनी फार शिकाव असे वाटायचे त्यामुळे तिन्ही मुलींना त्यांनी शिकवल कालांतराने दोन मुलींचे लग्न झाले. सर्वात लहान शिवानी लहानपणापासूनच हुशार व तल्लख बुद्धि असलेली 10 पर्यतचे शिक्षण शिवानीने नूतन कन्या शाळा भंडारा येथे केले त्यानंतर 11 पासुनचे तर एम ए. पर्यंतचे शिक्षण जे.एम. पटेल कॉलेज भंडारा येथे केले. यात तिला तिच्या बहिणीकडून फार मदत झाली खूप शिकायची इच्छा असल्यामुळे मला अद्याप लग्न करायचे नाही माझ्या लग्नावरचा सर्व खर्च तुम्ही माझ्या शिक्षणावर खर्च करा अशी ती तिच्या वडीलांना म्हणायची तिची शिक्षणाप्रती आत्मीयता बघून ती पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेली. समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत असते त्यातूनच तिला परदेशी शिष्यवृत्तीची माहिती समजली व ती त्याचा लाभ घेण्याकरीता ती समाज कल्याण विभागाकडे तिने अर्ज सादर केला. तीची शिक्षणाबद्दची तिव्र इच्छा बघून तिला समाज कल्याण मधील कर्मचाऱ्यांनी पूरेपूर मदत केली. “वडील मजूरी करतात, परदेशात शिक्षणासाठी जाण्याबाबत कधी विचारही केला नव्हता आज समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे आणि तेही इतक्या लवकर प्रक्रिया होऊन शक्य झाले यावर विश्वासच बसत नाही डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी ही प्रक्रिया पारदर्शक व जलद गतीने राबिवली त्यामुळे हे शक्य झाले. माझी लंडन येथील एडिनबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये मॅन्युअल स्कॅवेंजिंग याविषयी संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे. समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे माझे परदेशात उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्न सकार झाले. ” असे शिवानीने सांगितले.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जातीमधील 75 विद्यार्थ्यांना दरवर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो. यावर्षी एकूण विद्यार्थ्यांपैकी 42 विद्यार्थी तर 33 विद्यार्थींनी आहेत. यामध्ये नागपूर विभागातील 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील 16, भंडारा जिल्ह्यातील 4, गोंदिया जिल्ह्यातील 1 व चंद्रपूर जिल्ह्यातील 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यातीलच एक म्हणजे भंडारा जिल्ह्यातील शिवानी गंगाधर वालदेकर. कारण अवघ्या काही दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्धी करणे, अर्ज स्वीकारणे, तपासणे, त्रुटीची पुर्तता करुन घेणे, गृहचौकशी करणे, सर्व कागदपत्रांची पडताळणी करणे या सर्व बाबीचा विचार करता तसेच कोविडची परिस्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ, राज्यात व देशात कोरोनाचे गंभीर संकट कमी दिवसाच्या कालावधीमध्ये व लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये विभागाने रात्रीचा दिवस करुन विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देत शिष्यवृत्ती मंजूर केली व अंतिम मंजूरी आदेश दिले आहे.
देशातील विविध राज्यामध्ये अशा पद्धतीने शिष्यवृत्ती दिली जात असली तरी तितक्याच वेगाने राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने केलेली कामगिरी ही विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारी व त्यांचे भविष्य उज्वल करणारी ठरली आहे. या कामगिरीमुळे विद्यार्थी देखील उत्साही व आनंदी झाले आहेत. दरवर्षी असंख्य विद्यार्थी परदेशात जात असले तरी त्यात सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थी प्रथमच शिष्यवृत्ती योजनेमुळे जात असल्याने व इतरही बरीच प्रक्रिया करावी लागत असल्याने ते निश्चितच तणावात असतात हा ताण कमी झाल्याने समाधान व्यक्त केले.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या गतीशील निर्णयामुळे तसेच विभागाने यावर्षीची योजना धडाक्यात मार्गी लावली त्यामुळे त्यांचे आभार मानले. तसेच डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे, व समाज कल्याण विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
जनसंपर्क अधिकाररी समाज कल्याण विभाग, नागपूर