पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन,
दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन प्रशिक्षण
चंद्रपूर दि.23 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 2 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य पालन यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे
सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 1 सप्टेबंर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे मो. 9011667717 व कार्यक्रम आयोजिका वनश्री रामटेके मो. 9766499599 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.