जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक
- आज बरे झालेले रुग्ण 00
- बरे झालेले रुग्ण 58936
- एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 60075
- क्रियाशील रुग्ण 06
- आज 00 मृत्यू
- एकूण मृत्यू 1133
- रिकव्हरी रेट 98.10 टक्के
- मृत्यू दर 01.89
- आजच्या टेस्ट 160
भंडारा, दि.17:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या एक निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या शून्य आहे. आज 160 व्यक्तींची चाचणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 0.62 टक्के आहे. जिल्ह्यात आता 06 सक्रिय रुग्ण आहेत.
आज 00 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58936 झाली आहे. आज एक व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60075 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 43 हजार 675 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60075 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 01, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58936 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60075 झाली असून 06 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.
नागरिकांना आवाहन
- कोविडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे,मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
- साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी20 सेकंद व्यवस्थित धुवा.
- साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.