पेन्टिंग्जच्या माध्यमातून चंद्रपुर जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव अधोरेखित करण्याचा चित्रकार प्रवीण कावेरी यांचा उपक्रम अभिनंदनीय : आ. सुधीर मुनगंटीवार
ऐतिहासिक चंद्रपुर जिल्ह्यातील पुरातन पाउलखुणा टिपत पेन्टिंग्ज काढण्याचा उपक्रम गेली 5 वर्षे प्रवीण कावेरी व त्यांचे सहकारी राबवित आहेत. या पेन्टिंग्ज च्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचे ऐतिहासिक वैभव अधोरेखित केले गेले आहे. ही पेन्टिंग्ज शाळेला कायमस्वरूपी देण्याचा कावेरी यांचा निर्णय अभिनंदनीय आहे. अडीच एकर परिसरात चित्रकलेशी सम्बंधित आंतरराष्ट्रीय शाळा असावी अशी मुख्याध्यापकांची इच्छा आहे. या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. 15 ऑगस्ट रोजी चंद्रपुर तालुक्यातील चिंचाला येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इंटरनेशनल स्कूल , जिप उच्च प्राथमिक शाळा चिंचाला यांच्या संयुक्त विद्यमाने श्री प्रवीण कावेरी यांनी काढलेल्या चित्रांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सह एमआईडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा , अभ्यासक अशोकसिंहजी ठाकुर, सरपंच रंजना कांबले, भाजपा जिल्हा महासचिव नामदेव डाहूले,श्री दुर्योधन ,मुख्याध्यापक श्री आस्वलेआदिंची उपस्थिति होती.
यावेळी प्रवीण कावेरी यांनी आ. मुनगंटीवार यांचे प्रोत्साहन कायम लाभत असल्याबाबत आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतर्फे कावेरी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला चिंचाला येथील नागरिक , शिक्षक , शिक्षिका आदिंची उपस्थिति होती.