मशरुम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रम
Ø इच्छुक युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर दि. 13 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता 24 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये ऑनलाईन मशरुम उत्पादन व उत्पादने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये मशरुम उत्पादन उद्योगास असलेला वाव, मशरुम उत्पादन प्रक्रिया, मशरुम पासून विविध उत्पादने तयार करणे, पॅकेजींग, लेबलींग तसेच मशरुम उत्पादनाचे ब्रँडिग, अन्न व सुरक्षा आणि मानके, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणीतील विविध टप्पे, बाजारपेठ पाहणी, विक्री कला व उद्योग व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज विषयक योजनांची माहिती, कर्जप्रकरण इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या वेबसाईटवर 22 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड, मो.न. 9403078773, 07172-274416, कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे, मो. 9011667717 व कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे मो. 9309574045 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड यांनी केले आहे.