पशुधनावर आधारित शेळीपालन, मत्स्यपालन,
कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि.3 ऑगस्ट : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2021 या कालावधीत ऑनलाईन शेळीपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन, मत्स्य पालन यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्यांची विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलीत आहार, जिवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या ठिकाणी करा अर्ज:
सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या वेबसाईटवर दि. 8 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.
येथे साधा संपर्क:
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773 व कार्यक्रम आयोजिका वनश्री रामटेके 9766499599, यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.