गडचिरोली : मुलचेरा येथे मुख्यमंत्री उद्भवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

मुलचेरा येथे मुख्यमंत्री उद्भवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

बातमी संकलन  –  सदाशिव माकडे , गडचिरोली

मुलचेरा : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्भवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मुलचेरा येथे विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम मुलचेरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्याात आली. मुलचेरा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विवेकानंदपुर गावात शाखा स्थापन करून फलक लावण्यात आले यावेळी शिवसेना तालुकप्रमुख मुलचेरा गौरव बाला, शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख काशीनाथ कनांके, बंगाली आघाडी जिल्हा प्रमुख दिपक बिस्वास, युवासेना तालुका प्रमुख राजेश गुंतीवार, सतीश कर्मकार, अमित अधिकारी, राजू मंडल, सूकांत बाईन, राहुल सरकार, निताई कर्मकार, संदीप रॉय, संजित घरामी. व सर्व तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित राहून मा. उध्दव ठाकरे साहेब शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याचे वाढदवसानिमित्त विविध उपक्रम राबविले आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांना शुभेच्छा देऊन शिवसैनिक वाढ दिवसाच्या हार्दिक भगवा शुभेच्छा दिले