शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला साद
सिरोंचात अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी जय्यत तयारी
सदाशिव माकडे
(गडचिरोली जिल्हा)
अहेरी : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख ना.उद्धवजी ठाकरे यांचे आज मंगळवार २७ जुलै रोजी वाढदिवस असून राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापूर आणि दरड कोसळल्याने संकट निर्माण झाले असून वाढदिवस धामधुडाक्यात साजरा न करता साधेपणाने व संकटसमयी लोकांच्या मदतीसाठी उपक्रम राबविण्याचे खुद्द मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी आवाहन केल्याने अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार असून सिरोंचा येथे दोन दिवसांपासून किट तयार करण्याची जय्यत तयारी जिल्हाप्रमुख रियाज शेख, महिला संघटिका करूना जोशी, तालुका प्रमुख अमित तिपट्टीवार, संघटक दुर्गेश तोकला, उज्वल तिवारी, तुषार येन्डे व शिवसैनिक परिश्रम घेत आहेत.
अन्न धान्य व साहित्य वाटपाचे सप्ताह अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात राबवून पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, साहेब यांच्या “वाढदिवसाची खरी भेट” लोकोपयोगी उपक्रमासाठी राहणार आहे.