कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना जिल्हा कोविड निधीमधून मदत
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण
गडचिरोली, दि.26 : जिल्हयात कार्यरत असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे स्थानिक नागरीकांनी कोव्हिड संदर्भात शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टीने देणगी स्वरुपात जो निधी जमा केलेला आहे. त्या निधीतून जिल्हयातील कोविड-19 मुळे ज्या बालकांच्या आई- वडिलांचा मुत्यू झालेला आहे अशा अनाथ झालेल्या जिल्हयातील बालकांना मदतीचा हात म्हणुन जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते मदत वितरीत करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे देणगी स्वरुपात जमा झालेला रु. 360757/- एवढा निधी अनाथ व एक पालक गमावलेल्या बालकांना सानुग्रह अनुदान म्हणुन मंजूर केला. अनाथ झालेल्या एकुण 10 बालकांना प्रति बालक रु. 10,555/- व एक पालक गमावलेल्या एकुण 102 बालकांना रु.2501/- एवढा निधि मंजुर केला असुन त्यातील काही बालकांना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
संबधित सर्व बालकांसोबत तसेच त्यांच्या नातेवाईकासोबत जिल्हाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली, त्यांना काही अडचण असल्यास आपण प्रत्यक्ष माझ्यासोबत तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्या सोबत संपर्क करण्याबाबत त्यांचा सुचना दिल्या . आपल्या सर्वासोबत शासन सक्षमपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी जी. एम. तळपाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण पंराडे, समिती सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरुनुले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते जंयत जथाडे, बाल संरक्षण कक्ष, उज्वला नाकाडे, संरक्षण अधिकारी, मनेश्र्वर कंरगामी, क्षेत्र कार्यकर्ता निलेश देशमुख, इत्यादी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.