पालकमंत्री वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 18 : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, खार जमीन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे 19 जुलै 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि. 19 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता एसीसी चांदा सिमेंट फॅक्टरी, सिमेंट नगर नकोडा येथे आगमन व कामगारांच्या समस्येबाबत अधिका-यांशी चर्चा, दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आगमन व राखीव, दुपारी 12.45 वाजता केपीसीएल अंतर्गत असलेली बराज खुली कोळसा खाण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व कामागारांच्या समस्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक, दुपारी 1.30 वाजता अल्ट्राटेक सिमेंट व्यवस्थापन व कंत्राटदारांची जिल्हाधिकारी कायालयात बैठक, दुपारी 2 वाजता कोव्हीड संभाव्य तिसरी लाट व लसीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा, दुपारी 2.30 ते 3 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.15 वाजता दुर्गापूर येथील लष्करे कुटुंबाची सांत्वनपर भेट, दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा, रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, उर्जानगर येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. 20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता हिराई विश्रामगृह येथे ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.