मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
चंद्रपूर दि. 6 जुलै : राज्यामध्ये कोविड-19 च्या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा, याकरीता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग, डोमेस्टिक वर्कर इत्यादी क्षेत्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानांतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 8 जुलै 2021 रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, वैद्यकीय शिक्षण संस्था आणि खाजगी रुग्णालयांमध्ये 20 पेक्षा अधिक बेड क्षमता असलेल्या रुग्णालयांनी ग्रीन चॅनलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी केलेली आहे. तरी सदर कार्यक्रमाचा लाभ जिल्हयातील युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.