पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Ø विविध विकास कामांचे करणार भूमिपूजन
चंद्रपूर दि.30 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार, दि. 1 जुलै 2021 रोजी, सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, सिंदेवाही येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता आयटीआय परिसर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदेवाही इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता नगरपंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित शहरातील सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:45 वाजता पंचायत समिती, सिंदेवाहीकरीता आमदार निधीतून प्राप्त शववाहिनीचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12:30 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील.
दुपारी 1 वाजता अंतरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता नवरगाव ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3:30 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथे आगमन व विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 4:30 वाजता रत्नापूर ता. सिंदेवाही येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह,चंद्रपूर येथे आगमन व राखीव. रात्री 8 वाजता हिराई विश्रामगृह, उर्जानगर, चंद्रपुर येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 2 जुलै 2021 रोजी सकाळी 9:15 वाजता चंद्रपूर येथून राजुराकडे प्रयाण करतील. सकाळी 9:45 वाजता शासकीय विश्रामगृह, राजुरा येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता राजुरा येथून कोरपनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता कन्हाळगाव ता. कोरपना येथे आगमन व एलडब्ल्यूई अंतर्गत कन्हाळगाव ते येलापुर रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता कोरपना येथे आगमन व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन कार्यालयाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12:30 वाजता अमलनाला, गडचांदूर येथे आगमन व अमलनाला सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 ते 1:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव राहील. दुपारी 1:30 वाजता गडचांदूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोविड-19, डेल्टा प्लस यासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. दुपारी 2:30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.