सिंदेवाही – बहुजन विध्यार्थी संघटना व नालंदा एजुकेशन एकेडेमि चंद्रपूरच्या वतीने भारतिय प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर सिंदेवाही तालुक्यातील माध्यमिक शालेय ,कनिष्ठ महाविध्यालय व महाविद्यालयिन विद्यार्थ्यासाठी तालुकास्तरीय ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा (एकल )-2021चे आयोजन करण्यात आले आहे .
बहुजन समाजातील उदयोन्मुख युवा गायक विध्यार्थीना गायन क्षेत्रात येण्यासाठी विचारमंच उपलब्ध करणे तसेच या क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहित करणे ,हा या कार्यक्रम आयोजनमागील उदेश्य आहे .
सदर स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविध्यालय तसेच महाविद्यालयामधिल इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या विध्यार्थीना सहभागी होता येणार आहे .या स्पर्धेतील विजेता प्रथम ,द्वितीय व त्रुत्रीय पुरस्कारप्राप्त विध्यार्थी स्पर्धकांना आयोजकांकडून बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत .
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विध्यार्थी स्पर्धकांनी आपल्या स्वतच्या आवाजातील देशभक्तीपर कोण्या एका गाण्यावरील एक ते दोन मिनिटाचा विडियो स्पर्धेचे परीक्षक प्रसिध्द सिंगर युवीन व तनुजा यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर 9970705666/9850749796 दि .21 जानेवारी 2021 पर्यंत पाठविण्यात यावे .अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक प्रा .भारत मेश्राम सिंदेवाही 8788936462 यांचेशी सम्पर्क साधावा ,असे आवाहन आयोजन नालंदा अकादमी चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा.भारत मेश्राम व बहुजन विध्यार्थी संघटना तालुका सिंदेवाही चे अध्यक्ष इंजि.सचिन शेंडे यांनी केले आहे .