दिव्‍यांग तथा सामान्‍य बाल महोत्‍सवाचे उद्घाटन १४ डिसेंबर रोजी

दिव्‍यांग तथा सामान्‍य बाल महोत्‍सवाचे उद्घाटन १४ डिसेंबर रोजी

देववाणी दिव्‍यांग बहुउद्देशिय संस्‍था चंद्रपूर तर्फे आयोजित दिव्‍यांग तथा सामान्‍य बाल कला महोत्‍सवाचे उद्घाटन दिनांक १४ डिसेंबर रोजी सायं. ४.०० वा. प्रियदर्शिनी नाट्यगृह चंद्रपूर येथे संपन्‍न होणार आहेञ उद्घाटन सोहळ्यानंतर महाअंतिम सोहळा संपन्‍न होणार आहे.

या महाअंतिम सोहळ्याचे उद्घाटन चंद्रपूर विधानसभेचे आमदार श्री. किशोर जोरगेवार यांच्‍या शुभहस्‍ते होणार असुन स्‍पर्धेचे सन्‍माननीय परिक्षक चोखेश्‍वर नाकाडे, मोहित पुराणकर आणि राहूल चौधरी यांची देखील विशेष उपस्थिती राहणार आहे. गायन स्‍पर्धा, वादन स्‍पर्धा, नृत्‍य स्‍पर्धा व फॅशन शो यांच्‍या अंतर्गत या महाअंतिम सोहळ्यात आहे. ऑडीशन राऊंड मधुन अंतिम फेरीत दाखल झालेल्‍या स्‍पर्धकांची रंगतदार अंतिम फेरी यावेळी रंगणार आहे.

दिव्‍यांग कलाकरांना व सामान्‍य बाल कलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी या महाअंतिम सोहळयाला मोठया संख्‍येने उपस्‍थीत राहण्‍याचे आवाहन संस्‍थेच्‍या अध्‍यक्ष मेघना शिंगरू, स्मिता रेभणकर, शालीनी ठाकरे, सुशिल सहारे, अमोल कडूकर, अश्‍वनी तोमर, निखिल आसवानी आदींनी केलेआहे.