युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थीचे हजेरीपत्रक दरमहा विहित वेळेत ऑनलाईन भरावे सहायक आयुक्त श्री.झळके

युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थीचे हजेरीपत्रक दरमहा विहित वेळेत ऑनलाईन भरावे सहायक आयुक्त श्री.झळके

भंडारा, दि. 13 : उमेदवाराना उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत भंडारा जिल्हयामध्ये विविध शासकीय तसेच खाजगी आस्थापना मध्ये २३०० च्या वर प्रशिक्षणा रूजू होवून प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यप्रशिक्षण घेत आहेत.

सदर प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन दरमहा अदा करणेकरीता शासनामार्फत ऑनलाईन पोर्टलची निर्मीती करण्यात आलेली असून संबंधीत आस्थापना यांना त्याबाबतचे युजर आयडी देण्यात आलेली आहे. आस्थापना यांना देण्यात आलेल्या युजर आयडी च्या माध्यमातून संबंधीत आस्थापना प्रशिक्षणार्थी यांची हजेरी दरमहा पोर्टलवर अपडेट करण्यात येत आहे. त्यानंतर जिल्हा कार्यालयामार्फत सदर माहितीची पडताळणी करुन ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून आयुक्त यांचेकडे पाठविण्यात येते. तदनंतर प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन आयुक्तालयामार्फत प्रशिक्षणार्थी यांच्या आधार लिंक बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

भंडारा जिल्हयातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंर्तगत प्रशिक्षणार्थी रूजू करुन घेतलेल्या सर्व शासकीय तसेच खाजगी आस्थापना यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनीप्रशिक्षणार्थी यांचे हजेरीपत्रक दरमहा विहित वेळेत ऑनलाईन पध्दतीने भरावे. तसेच काही अडचण आल्यास वेळीच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकुल भंडारा येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन डॉ. सुधाकर झळके, सहायक आयुक्त भंडारा यांनीकेले आहे..