जिल्हात वाहन परवाना शिबीरचे आयोजन

जिल्हात वाहन परवाना शिबीरचे आयोजन

गडचिरोली,दि.12: गडचिरोली जिल्हयातील विविध तालुक्यातील जनतेच्या सुविधेकरिता तसेच जनतेच्या वेळेची बचत होण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,गडचिरोली यांचेमार्फत वडसा, आलापल्ली व सिरोंचा येथे लायसन्स करिता माहे डिसेंबर 2024 करिता शिबीर घेण्यात येत आहे. त्यामध्ये जनतेस शिकाउु अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चे कामकाज करण्यात येईल. सदर शिबीराचा लाभ त्या तालुक्यातील जनतेने घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. वडसा शिबीराचा दिनांक 16 डिसेंबर 2024, आलापल्ली शिबीराचा दिनांक 18 डिसेंबर 2024, सिरोंचा शिबीराचा दिनांक 20 डिसेंबर 2024.