१०० दिवसीय क्षयरोग मोहिम उद्घाटन संपन्न

१०० दिवसीय क्षयरोग मोहिम उद्घाटन संपन्न

गडचिरोली,दि.09: जागतिक आरोग्य संघटनेने ठरविल्या धोरणानुसार सन 2030 पर्यत जगभरातून क्षयरोगाचे उच्चाटन करणे अपेक्षीत आहे. भारत सरकारच्या महत्वांक्षी धोरणानुसार हे उदिष्ट सन २०२५ पर्यंत साध्य करावयाचे आहे व त्या दृष्टीने देशभरातील 347 जिल्हयामध्ये 100 क्षयरोग मोहिम दि.7 डिसेंबर 2024 पासुन सुरु करण्यात येत आहे.

मा.श्री.संजय दैने,जिल्हाधिकारी गडचिरोली व मा.श्रीमती आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.गडचिरोली यांच्या मागदर्शनाखाली 100 दिवसीय क्षयरोग उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला व आजच्या या उद्घाटन समारंभाला प्रमुख उद्घाटक म्हणुन मा.डाँ.माधुरी किलनाके.जिल्हा शल्यचिक्त्सिक, जिल्हा रुग्णालय गडचिरोली प्रमुख पाहुणे म्हणून मा.डाँ.अमित साळवे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ,जि.प.गडचिरोली ,डाँ. मनिष मेश्राम , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक , सा.रु.गडचिरोली, डाँ बागराज धुर्वे , आरएमओ,डाँ पंकज हेमके , जिल्हा हिवताप अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते व सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाँ. सचिन हेमके, जिल्हा क्षयरोग अधिकरी गडचिरोली यांनी केली.

क्षयरोग हा मायकोबॅक्टोरियम टुबरक्युलासिस नावाच्या या जंतुमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यावर क्षयरोगाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात होतो. क्षयरोग प्रसाराचे प्रमाण कमी करणे व मृत्युदर कमी करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने सन 2025 पर्यंत देश क्षयमुक्त करण्यासाठी दि.07 डिसेंबर 2024 ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत निक्शय शिबिराद्वारे समाजातील अतिजोखमीच्या लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार असुन त्यामंध्ये 2 आठवडेपेक्षा जास्त दिवसाचा खोकला, भुख मंदावणे, वजन कमी होणे,छातीत दुखणे,सध्याकाळी येणारा हलका ताप, थुंकीवाटे रक्त पडणे , पुर्वी क्षयरोग झालेले, क्षयरोग बाधित रुग्णाच्य सहवासीत , एचआयव्ही बाधित रुग्ण, कुपोषित व्यक्ती , 60 वर्षावरील व्यक्ती, मधुमेह बाधित धुम्रपान करणारे व्यक्ती यांची क्षयरोगाबाबतची तपासणी करावयाची आहे. तापसणी अंती निदान झालेल्या क्षयरुग्णास 6 महीने औषधापचार शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यातर्फे देण्यात येईल. क्षयरोगावरील तपासणी व औषधापचार शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.

तसेच 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेच्या जनजागृतीकरिता निक्शय वाहनाला मान्यवराच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून शुभारंभ करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.गणेश खडसे व आभार प्रदर्शन श्री.गिरिष लेनगुरे यांनी केले व या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्षयरोग कार्यालयाचे श्री.मनिष बोदेले (जिल्हा कार्यक्रम समन्यक) श्री. अनिलकुमार चौहाण (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक) श्री. विलास कुंभारे (आरोग्य सहाय्यक) श्रीमती लता येवले (एसटीएलएस) श्री.विनोद काळबाधे (टीबीएचव्ही) आदींनी सहकार्य केले.