शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन

शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन

भंडारा दि. 8 : नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग संचालनालय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अधिनस्त नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन  उद्या दुपारी बारा वाजता नियोजन भवन येथे होणार आहे.

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते तर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील उद्या दूरदृष्टी प्रणाली द्वारे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य ,श्रीमती अनुप्रिया सिंह पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल, लोकसभा सदस्य डॉ. प्रशांत पडोळे, आमदार परिणय फुके, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार नाना पटोले, आमदार  नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे हे राहणार आहेत.

नियोजन भवन येथे उद्या दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विपुल अंबाडे यांनी दिली.