कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यासाठी नोंदणी करावी
नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना 84 लाख तर सोयाबीन उत्पादकांना 5 लाखाचे अर्थसहाय्य
मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व किंमतीतील घसरणीमुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागल्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करण्यात आली होती. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्यातील कापूस पिकाचे ६५९७ खातेदार पैकी ४०२४ खातेदार यांची नोंदणी झालेली आहे तसेच सोयाबीन १९६ खातेदार पैकी १७५ खातेदार यांची नोंदणी झालेली आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ अखेर कापूस पिकाचे ६५९७ खातेदार पैकी नोंदणी व ई.के.वाय.सी पूर्ण केलेल्या १७७३ खातेदार यांच्या खात्यात रुपये ८४ लाख ४३ हजार ९७० रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच सोयाबीन १९६ खातेदार पैकी नोंदणी व ई.के.वाय.सी पूर्ण केलेल्या ११४ खातेदार यांच्या खात्यात ५ लाख ४२ हजारर ८०० रुपये जमा करण्यात आलेले आहे. उर्वरित खातेदारांनी लवकरात लवकर संबंधित कृषी सहाय्यककडे नोंदणी व ई.के.वाय.सी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
वैयक्तिक खातेदार साठी आधार कार्ड, संमती पत्र व मोबाईल क्रमांक आवश्यक असून सामूहिक खातेदार यांच्यासाठी आधार कार्ड, सामाईक खातेदाराचे ना-हरकत प्रमाणपत्र, संमती पत्र व मोबाईल क्रमांक आवश्यक असून सदर सर्व कागदपत्रे आपल्या गावाच्या कृषि सहाय्यक यांच्याकडे जमा करायची असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.