तालुकास्तरीय विद्यार्थी सुरक्षितता मुख्याध्यापक कार्यशाळा
शिक्षण विभाग, पंचायत समिती, सिंदेवाही च्या वतीने तालुक्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी पंचायत समिती सभागृहात घेण्यात आली.
यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री किशोर पिसे, गटशिक्षणाधिकारी, प स सिंदेवाही, प्रमुख मार्गदर्शक श्रीमती विभावरी तितरे गट विकास अधिकारी, प स सिंदेवाही, श्री विजय राठोड, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन सिंदेवाही, श्री सागर महाले सहा पोलीस निरीक्षक, कु सुरेखा माकडे, विधिज्ञ, तालुका न्यायालय सिंदेवाही, श्री लोणारे संरक्षण अधिकारी, कु वनश्री रामटेके समुपदेशक, कु राजश्री वसाके, बालरक्षक महिला प्रतिनिधी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व साधन व्यक्ती, समावेशीत शिक्षण तज्ञ कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी सुरक्षितता संदर्भात शाळा व महाविद्यालयासंदर्भात पोकसो कायदा जाणीव जागृती, चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक, पोलीस हेल्पलाईन क्रमांक, पोकसो ई-बॉक्स, चिराग ऍप्स, तक्रार पेटी व प्राप्त तक्रारींचे निवारणाची करावयाची कार्यवाही, सेक्सटार्शन, सायबर क्राईम इत्यादी विषयावर सभेमध्ये उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
विधिज्ञ सुरेखा माकडे, तालुका न्यायालय सिंदेवाही यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींवर तसेच महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार व त्यावर घ्यावयाची खबरदारी याविषयी सविस्तर माहिती दिली.
श्री विजय राठोड पोलीस निरीक्षक यांनी पोक्सो अधिनियम 2012 मधील कलम 21 विषयक माहिती दिली. सागर महाले सहा पोलीस निरीक्षक यांनी सायबर क्राईम व लैगिक अपराध याविषयी माहिती दिली.
गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी कार्यक्रमाचे सविस्तर प्रास्ताविक केले, श्रीमती विभावरी तितरे गट विकास अधिकारी यांनी मुलींवर होणाऱ्या अत्याचारविषयी तीव्र शब्दात चीड व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री भिमानंद मेश्राम तर आभारप्रदर्शन कु राजश्री वसाके यांनी केले.