तथाकथितांच्या ‘स्टंटबाजी’ला धनगर समाज भीक घालत नाही-हेमंत पाटील

तथाकथितांच्या ‘स्टंटबाजी’ला धनगर समाज भीक घालत नाही-हेमंत पाटील

‘एसटी’ प्रवर्गातून धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२४

राज्यातील धनगर समाज हा अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित असल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देणे ही काळाची गरज आहे. राज्य सरकारने या अनुषंगाने पावले उचलली आहेत.पंरतु, यानिमित्ताने धनगर विरूद्ध आदिवासी असा संघर्ष पेटवला जात आहे.काही तथाकथित नेत्यांनी मंत्रालयात केलेल्या ‘स्टंटबाजी’ला धनगर समाज भीक घालत नाही, अशा कठोर शब्दात ओबीसी नेते आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आयएसी) राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अविवेकी लोकप्रतिनिधींचा समाचार घेतला.

आमदारांची ही कृती म्हणजे केवळ दिखावा आहे. उलटपक्षी धनगर समाज हा आतापर्यंत एसटी आरक्षणापासून वंचित असल्याने या आंदोलक लोकप्रतिनिधींनी मोठ्या मनाने धनगर समाजाचे स्वागत करायला हवे होते, असं मत देखील पाटील यांनी व्यक्त केले. आमदारांच्या या अविवेकी वर्तनामुळे धनगर विरुद्ध आदिवासी असा संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजासाठी केवळ स्टंटबाजी करून चालत नाही, संघर्ष करण्याची वृत्ती हवी. मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उड्या घेणाऱ्या या आंदोलकांमध्ये ही वृत्ती दिसत नाही.

केवळ दबाब निर्माण करण्यासाठी असले देखावे करून आंदोलन आणि जनहिताचे कार्य पुर्णत्वास जात नाही, अशा शब्दात हेमंत पाटील यांनी आंदोलकांची कानउघाडणी केली.राज्य सरकारवर अशाप्रकारचा दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असले तर धनगर बांधव ही गप्प बसणार नाही, असा इशाराच त्यांनी यानिमित्ताने दिला. धनगर आरक्षणासाठी प्रदीर्घ न्यायालयीन तसेच सामाजिक लढा लढण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रकाशझोतात येण्यासाठी अशाप्रकारे स्टंटबाजी करणार्या लोकप्रतिनिधिंच्या वर्तनाला आणि आंदोलनाला आम्ही भीक घालत नाही, असे ओबीसी-मराठा समाज समन्वयक राजेंद्र वनारसे यांनी स्पष्ट केले. राज्यात विधानसभा निवडणूक राज्यात होऊ घातली आहे. अशात गेली पाच वर्ष आदिवासी समाजासाठी काही एक न केलेल्यामुळे संबंधित आमदारांवर मंत्रालयावरून उड्या टाकण्याची वेळ आली आहे. आदिवासी समाजाचा पुळका असल्याचे भासवण्यासाठी धनगर आरक्षणाचा विरोध काही तथाकथित करीत आहेत. आदिवासी समाज त्यांच्या धनगर बांधवांच्या सदैव पाठीशी आहे, हे येथे अधोरेखित करने महत्वाचे आहे. धनगर, आदिवासी आणि मराठा बांधव एकमेकांना सोबत असून जातीयवादी मानसिकता असलेल्या पुढारांच्या दबावाला ते बळी पडणार नाही, असे वनारसे म्हणाले.