महिला मार्गदर्शन मेळाव्याला लाडक्या बहिणीचा उत्स्फुर्त प्रतिसाद
भंडारा दि. 5 : महिलांच्या जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चैतन्य ग्राउंड येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित महिला मार्गदर्शन मेळाव्याला मोठया प्रमाणावर महिला उपस्थित होत्या.
यावेळी मंचावर आमदार परिणय फुके, आमदार नरेंद्र भौंडेकर, जिल्हा परिषदेचे यशवंत सोनकुसरे, जि.प.सदस्य विनोद बांते, पं.स समिती किर्ती गणवीर, पं.स सभापती रत्नमाला चेटुले, माजी नगरसेवक संजय कुंभलकर, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलत, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, माविमचे जिल्हा समन्वयक संगीता भोंगाडे, महीला व बालविकास अधिकारी तुषार पौनीकर आदी उपस्थित होते.
लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना आर्थिक स्वांतत्रय मिळावे तसेच त्या स्वावंलबी व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने ही योजना सुरू केली. त्या योजनेला जिल्हयात उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. माता भगीनींच्या सर्वकष विकासासाठी शासन कार्यरत राहील. असा विश्वास आमदार परिणय फुके यांनी आज व्यक्त केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन झाले, असे सांगून आमदार श्री. भौंडेकर म्हणाले, आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कुठेही कमतरता नाही, फक्त महिलांना योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. संधी मिळाली की त्याचं सोनं करण्याची क्षमता महिलांमध्ये आहे. महिलांच्या उत्पादनासाठी तालुका तसेच जिल्हास्तरावर ग्रामसंघ उभारण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी श्री.कोलते यांनी जिल्हयातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 2 लक्ष 91 हजार अर्जांना मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उषा कावळे, लाखनी, शिल्पा बोरकर, पवनी, कुमुद भलावी, मुरमाडी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच महिला बचतगटांना अर्थसहायाचे धनादेश देण्यात आले.
महिलांना पैठणी: लकी ड्रॉ द्वारे निवड करण्यात आलेल्या पाच महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये ज्योती झलके, संगीता पटले,यासह अन्य तिघी महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन मुकुंद ठवकर व ज्योती नागलवाडे यांनी तर आभार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश मेंढे यांनी मानले.