राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून 640 प्रकरणे निकाली.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून 640 प्रकरणे निकाली.

भंडारा दि. 30 : दिनांक 28/09/2024 रोजी जिल्हा न्यायालयभंडारा येथे आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण 358 प्रलंबित प्रकरणे तर 282 दाखल पूर्वन्यायप्रविष्ठ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्लीमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षजिल्हा विधी सेवा प्राधिकरणभंडारा राजेश गो. अस्मर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28/09/2024 रोजी सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालयेकौटुंबीक न्यायालयकामगार न्यायालयऔद्योगीक न्यायालय राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सदर लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत असलेली एकुण 18503 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 640 मोटार अपघात प्रकरणे23 वैवाहिक वादाची प्रकरणे34 एनआयअॅक्ट प्रकरणे238 रक्कम वसुलची प्रकरणे1 कामगार वाद127 फौजदारी तडजोड योग्य व 53 दिवाणी स्वरूपाची प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालत मध्ये एम. एस. गणोरकरजिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीशभंडाराके. एच. ठोंबरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरभंडाराएस. एल. सोयंकेसह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणीभंडाराएम. जी. हिंगणघाटे2 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणीभंडारामा.  व्ही. व्ही. वाघमारे3 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणीभंडारायांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहीले तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. राजकुमार वाडीभस्मेअॅड. तौशिफ खानअॅड. शुभांगी नंदनवारअॅड. सोनाली तरारेअॅड. प्रियंका पशिने यांनी काम पाहीले.

 

इनसाईड स्टोरी

 

दिनांक 28 सप्टेंबर2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना लोकअदालतीच्या माध्यमातून नूकसान भरपाई लवकर मिळण्यास मदत झाली. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात अनेक दावे दाखल करण्यात आलेले असतात,

 

पंरतु न्यायालयात अशी प्रकरणे वर्षानूवर्षे प्रलंबीत असल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्वरीत नूकसान भरपाई मिळत नाहीअशा प्रकरणात मुत्यू पावलेली व्यक्ती कुटूंब प्रमुख असला तर त्याच्या कुटूंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जिल्हा न्यायालयभंडारा येथे यावेळी मोटार अपघाताच्या प्रकरणांसाठी एक पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. पॅनल प्रमुख म्हणून एम. एस. गणोरकरजिल्हा न्यायाधीश-1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीशभंडारा यांनी काम पाहीले. असे एकूण मोटार अपघाताचे 5 प्ररकणे निकाली करढण्यात आली. अशाच एक 2021 पासून प्रलंबित प्रकणात 19 लाख पन्नास हजार नुकसान भरपाई रॉयल सुंदरम जनरल इन्शुरंस कंपनीकडून पिडीत पक्षकाराच्या परिवाराला देण्यात आले. पिडीते कडून प्रकरणात अॅड. एम. डी. खोब्रागडे तर विमा कंपनी कडून अॅड एच. एन वर्मा यांनी काम पाहीले. लोकअदालतीच्या माध्यमातुन प्रकरण निकाली काढल्यामुळे पक्षकाराला दिलासा मिळाला.

 

दिनांक 28/09/2024 रोजी झालेल्या लोक अदालतीचा दिवस काही दांपत्यासाठी त्यांचे वैवाहिक जीवन पुनः प्रस्थापित करण्याकरिता महत्वाचा ठरला. इतर प्रकरणांप्रमाणेच कौटूंबिक न्यायालयभंडारा येथे प्रलंबित प्रकरणात पती व पत्नी यांच्या मध्ये शुल्लक कारणामुळे वाद निर्माण होत एकमेकावर दोषारोपन केले गेले शेवटी त्यांचे जिवन विस्कटित झाले होते. पत्नीने घटस्फोटा करिता कौटूंबिक न्यायालयभंडारा येथे अर्ज दाखल केलेसदर प्रकरण सहा महिन्यापासून प्रलंबित होते. दिनांक 28/09/2024 रोजी झालेल्या

 

जिल्हा तसेच जिल्हयातील तालुक्यांमध्ये आयोजीत राष्ट्रीय लोकअदालतीत वैवाहीक वादाच्या एकूण 4 प्रकरणांमध्ये आपसी सहमतीने तडजोड घडवून आणण्यात पॅनल सदस्यांना यश आले.

लोकअदालतीच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्यबददल जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव  बिजु बा. गवारे यांनी सर्व न्यायिक अधिकारीपॅनल सदस्यअधिवक्ताकर्मचारीपोलीस प्रशासनाचे अधिकारीकर्मचारीप्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी व पक्षकारांचे आभार मानले.