मुलींनो, देशातील सर्वोत्कृष्ट शाळेत प्रवेश घेण्याची संधी मिळवा डॉ.संजय कोलते जिल्हाधिकारी
भंडारा दि.26 : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेकरिता प्रवेश अर्ज करण्याची तारीख 7 ऑक्टोबर, 2024 पर्यंत वाढली आहे.
नवोदय विद्यालय समितीकडून जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2025 साठी इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर होती. ती आता 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ही मुदतवाढ म्हणजे जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थिनींना शिक्षणाच्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज् अशा उत्तम शाळेत शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देणारी बाब असल्याने या विषयाकडे लक्ष देऊन शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थिनींना 7 ऑक्टोबर 2024 पूर्वी फॉर्म भरण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे फॉर्म भरून घ्यावेत असे आवाहन डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
इयत्ता सहाव्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी पालकांना एकदाच अर्ज करावा लागेल केंद्रीय यादीनुसार ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण लागू केले जाईल, तर केंद्रीय यादीत समावेश नसलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गटात अर्ज करावा लागेल. इतर आरक्षण नियमानुसार असेल.
असा करा अर्ज.
सर्वप्रथम navodaya.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा होमपेज वरील वर्ग 6 ची नोंदणी या लिंक वर क्लिक करा.
यानंतर येथे विचारलेली माहिती भरून नोंदणी करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.