शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा

शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा

भंडारा दि.25 : दि. 24 सप्टेंबर 2024 मंगळवार ला महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्यरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळावा राबविण्यात आले. या प्रसंगी मुख्यमंत्री युवा कार्य मेळाव्याला उद्‌घाटक म्हणून जिल्हाधिकारी भंडारा – डॉ. संजय कोलतेप्रमुख पाहुणे सहा. आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता व नाविण्यता विभाग भंडारा – सुधाकर झळके, प्राचार्या औ.प्र.संस्था भंडारा – जे.व्ही. निंबार्तेसहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथ अनुशांगिक सुचना केंद्र भंडारा – सी.एल झापड विभागीय समन्वयक (राईटवॉक सफाउंडेशन) – सचिन निंबार्ते उपस्थित होते. तसेच मेळाव्या प्रसंगी अनेक आस्थापना उपस्थित होने 1. हिदुस्थान कंपोझिट2. सनफेंग आर्यन स्टिल भंडारा, 3एम.एम.पी. लिमीटेड भंडारा4आयुक्त राज्यकर विभाग भंडारा, 5. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ भंडारा या औद्योगिक तथा शासकिय आस्थपनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तसेच संस्थेचे गटनिदेशक  बटुकले सरसाखरवाडे सर उपस्थित होते. यामध्ये जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी उमेदवारांना उत्तम मार्गदर्शन केले. सदर मेळाव्यात 345 युवक युवती नोंदणी केली त्यापैकी 79 युवकांची नियुक्ती करण्यात आली. सदर मेळावा उत्तमरित्या पार पडला.