नवरगाव – रत्नापूर रहदारी रस्त्याजवळ मृतदेह आढळला
सिंदेवाही :- सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर – नवरगाव रहदारीच्या रस्त्याजवळ शेतशिवारात एका नवरगाव येथिल तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने गावात खळबळ उडाली आहे. सदर मृतकाचे नाव ज्ञानेश्वर शामराव बाकीरवार (वय ३१ वर्ष) असे आहे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१ /o९/२०२४ रोजी सकाळी १० वाजता नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर हा मेंढ्या राखण्यास शेतात गेला असता तेथे तो मरण पावला. ज्ञानेश्वर हा त्या दिवसापासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. दिनांक २३/०९/२०२४ रोजी सोमवरला दुपारी १ वाजता एक दुचाकी स्वार लघुशंकेसाठी थांबला असता त्या व्यक्तीस ज्ञानेश्वर याचा मृतदेह दिसून आला. सदर घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. नवरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्यास ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना केले. अती मद्यप्राशनाने मृत्यू झाला असावा असा अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेचा तपास सिंदेवाही पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात नवरगाव पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस संदीप कोवे करीत आहेत.