डॉ.साहेब मित्र परिवार तर्फे डॉ.मंगेश गुलवाडे यांचा वाढदिवसा निमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन.

डॉ.साहेब मित्र परिवार तर्फे डॉ.मंगेश गुलवाडे यांचा वाढदिवसा निमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन.

जिल्यातील प्रसिद्ध डॉ.मंगेश गुलवाडे साहेब यांचा वाढदिवसा निमित्त महानगरात दी.21 सप्टेंबर शनिवार ला विविध लोकोउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रम.राकेश बोमनवार व टीम तर्फे होणार आहे.

शहरातील विविध ठिकाणातील मंदिरात महाआरतीचा आयोजन रामकुमार आकापलिवार,मुग्धा खांडे व टीम यांचा माध्यमातून होणार असून मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना चे कॅम्प प्रविण उरकुडे यांचा कडून डॉ. गुलवाडे हॉस्पिटल येथे घेण्यात येत आहे.
डेबु सावली वृध्दाश्रम या ठिकाणी माजी नगरसेविका छबू ताई वैरागडे,मयूर भोकरे, पवन ढवळे तर्फे फळ वाटप करण्यात येत आहे.जल नगर परिसरात भव्य रोगनिदान शिविराचे आयोजन राकेश बोमनवार,अमित निरंजने तर्फे करण्यात येत आहे.वाढदिवसा निमित्त परिसरातील दलित वस्तीत ब्लँकेट वाटप कार्यक्रम रामकुमार आकापल्लीवार तर्फे घेण्यात येत आहे.आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार कार्यक्रम डॉ.मंगेशजी गुलवाडे यांचा हस्ते घेण्यात येत आहे. अश्याप्रकारे साहेब मित्र परीवारा तर्फे वाढदिवसाच्या दिनी विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.