“राजीव गांधी पंचायत राज संघटन” च्या “महाराष्ट्र प्रदेश महासचीव” पदावर “यूनूसभाई शेख” यांची नियुक्ति

“राजीव गांधी पंचायत राज संघटन” च्या “महाराष्ट्र प्रदेश महासचीव” पदावर “यूनूसभाई शेख” यांची नियुक्ति

मुख्य संपादक मिथुन मेश्राम 9923155166

राजीव गांधी पंचायत राज व्यवस्था या संवैधानिक दर्जा प्राप्त असलेल्या “पंचायत राज व्यवस्थापन” च्या कार्यकुषलतेला न्याय मिळावे “स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन आणि शासन, लोकहित राज्य व्यवस्था असावी, स्थानिक पातळीवरील शेवटच्या घटकास न्याय मिळावे, नागरिकांना पंचायत राज व्यवस्थापनेच्या माध्यमातून चालविन्यात येणाऱ्या योजना, आपले सरकार-आपले राज या धोरनाला चालना मिळावी, सामान्य प्रशासन आणि सामान्य नागरिक व कुटुंब यांच्यात समन्वय साधता यावे अश्या इत्यादि अनेक उद्देशाने वर्ष 1984 मध्ये “दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यानी “राजीव गांधी पंचायत राज व्यवस्था” अशी संवैधानिक व्यवस्था राष्ट्रीय स्तरावर निर्माण केली आणि त्यास संवैधानिक दर्जा प्राप्त करुण देत “पंचायत राज व्यवस्थेची” निर्मीती केली.
याच धरतीवर कांग्रेस पक्षाने सुद्धा सदर “राजीव गांधी पंचायत राज “कांग्रेस संघटन” या नावाने राष्ट्रीय स्तरावर “पक्षीय संघटन” स्थापन करीत संपूर्ण भारतात त्यांचे विस्तारीकरण करीत “राजीव गांधी पंचायत राज कांग्रेस संघटन महारष्ट्र प्रदेश” अशी स्थापना केली ज्याचे प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी ठाकरे साहेब आहेत. श्री .संजयजी ठाकरे यानी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यानी दिलेल्या सूचनेचे पालन करीत “श्री यूनूसभाई हबीब शेख” यांची “राजीव गांधी पंचायत राज कांग्रेस संघटन” च्या “प्रदेश महासचिव” या पदावर नियुक्ति करीत माननीय नामदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या हस्ते नियुक्ति पत्र प्रदान केले.
या वेळेस प्रामुख्याने “राजीवगांधी पंचायत राज संघटन कांग्रेस” चे प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी ठाकरे साहेब, श्री रामाकांतजी लोधे अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी, श्री सुनिलभाऊ उतट्टलवार अध्यक्ष शहर कांग्रेस कमेटी सिंदेवाहि, प्रभारी प्रभाकरजी भोयर सर, श्री स्वप्निलजी कावळे अध्यक्ष न.प. सिंदेवाहि-लोनवाहि, पक्षाचे इत्यादि मान्यवर उपस्थीत होते.
या जबाबदारी प्रसंगी सर्वाणि यूनूसभाई शेख़ यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.